
मुंबईः चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे रविवारी हाती आले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला धूळ चारुन सत्ता काबिज केली होती. त्यामागे एक चेहरा होता, तो चेहरा म्हणजे सुनील कानुगोलू.
काँग्रेसने सुनील यांच्याकडे मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्याची जबाबदारी सोपवली होती. कर्नाटकनंतर सुनील यांची जादू तेलंगणामध्ये चालली आहे. कानुगोलूंच्या राजकीय चातुर्यामुळे कर्नाटमध्ये काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा जिंकल्या होता.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मुख्य सल्लागार म्हणून सुनील कानुगोलू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आलेला आहे.
कानुगोलू यांची कार्यपद्धती अतिशय आक्रमक आहे. त्यांनी मध्य प्रदेशात २३० पैकी १२५ जागा आणि तेलंगणात ११९ पैकी ६७ जागा जिंकतील, असा दावा केला होता. मध्य प्रदेशच्या बाबतीत त्यांचं चातुर्य कामी आलेलं नसलं तरी तेलंगणमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. अल्पसंख्यक समाज काँग्रेसच्या बाजूने कसा उभा राहिल; यावर त्यांनी काम केलं. शिवाय बीआरएसची भाजपसोबत छुपी युती आहे, असा प्रसार करण्याचा त्यांनीच सल्ला दिला.
कानुगोलू यांनी २०१४ पूर्वी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम केले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारामध्ये ते प्रमुख घटक होते. त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्स (ABM) चे प्रमुख म्हणून काम केले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. त्यामुळे तेलंगणमध्ये त्यांची किमया चालली, असं बोललं जात आहे.
प्रशांत किशोर यांचे सहकारी म्हणून कानुगोलू यांनी यापूर्वी भाजप, द्रमुक, अण्णाद्रमुक आणि अकाली दल यांच्यासोबत काम केले आहे. आता ते काँग्रेससोबत काम करत आहेत. काँग्रेसने कर्नाटकमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आणि अन्य राज्यातदेखील जबाबदारी सोपवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.