Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

cash Seized In Sambhajinagar: आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण पथके सक्रिय झाली. जागोजागी वाहनांची तपासणी करून नियमबाह्यपणे आढळणारी रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त केला जात आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये भेटवस्तूंसह मद्याचाही समावेश असल्याचे संबंधित कक्षाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com