
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर आता मंत्रिपदांच्या वाटपाबाबत पेच निर्माण झाला आहे. गृहमंत्रालयावरून महायुतीमध्ये संघर्ष सुरू झाला. या खात्यासाठी युतीचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. सत्तानाट्यानंतर आता खातेनाट्य सुरू झाले आहे. यामुळे पुन्हा महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. तर आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे ३ पर्याय ठेवण्यात आले आहेत. यासाठी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.