
Achalpur Assembly Election 2024 result Marathi News : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याला सुरुंग लागला आहे. गेले सहा वर्ष बच्चू कडू सलग निवडून येत होते. यंदा बच्च कडू यांच्या विरोधात काॅंग्रेसचे बबलुभाऊ देशमुख आणि भाजपचे प्रवीण तायडे अशी तिरंगी लढत झाली.
भाजपचे प्रविण तायडे यांचा विजय झाला असून त्यांना 71294 मते मिळाली. बबलुभाऊ देशमुख यांना 52136 तर बच्चू कडूंना 49560 मते मिळाली आहेत.