
अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार याचे चित्र स्पष्ट झाले. मात्र उमेदवारी कोण ठेवणार व कोण काढणार याचे चित्र अस्पष्ट आहे. बंडोबांना ‘थंडोबा’ करण्याचे आव्हान आता पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. दरम्यान, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासोबत मुख्य लढाईत कोण राहणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.