
गुरुवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर एका शानदार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांना आयकरातून सूट देण्यात आली आहे.