
Maharashtra Assembly Election Result 2024 : अलिबाग विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचे महेंद्र दळवी निवडून आले आहेत. शेकापच्या चित्रलेखा उर्फ चिऊताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी पराभव केला. महेंद्र दळवी यांना एकूण 113599 मते पडली तर चित्रलेखा यांना 84034 मते पडली. तब्बल 29565 मतांच्या फरकाने चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला.