
वांद्रे पश्चिम विधानसभा जागा महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रतिष्ठेची जागा मानली जाते. येथे राजकीय डावपेच नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत. 2008 मध्ये विधानसभा जागांच्या परिसीमनानंतर हा परिसर वांद्रे पश्चिम म्हणून ओळखला गेला. पूर्वी या भागाचे वांद्रे विधानसभा क्षेत्र म्हणून प्रतिनिधित्व होते. गेल्या १० वर्षांपासून ही जागा आशिष शेलार यांच्याकडे आहे. या निवडणुकीतही भाजपकडून आशिष शेलार यांनाच उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून आसिफ झकारिया हे निवडणुकीच्या मैदानात आहे.