अहिल्यानगर : विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच अहिल्यानगर शहरात ‘भावी आमदार’ फलक झळकले. आपण तयारी करीत असल्याचे अनेक नेत्यांनी दर्शविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, तथापि, नेमका विरोधक कोण असेल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. कोतकर कुटुंबीयांच्या अचानक ‘एन्ट्री’मुळे इतर ‘भावी’ शांत झाल्याचे दिसून येत आहेत.