शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे पुरोगामी आहेत, ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. उलट शरद पवार यांचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा अशी आॅफरच भाजपने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना दिली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण फुटणा-या खासदारांनाही लाज वाटली पाहिजे असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.