
Maharashtra Assembly Election 2024 : उत्तर मुंबई चारकोप मतदार संघात भाजपचे योगेश सागर विजयी झाले. सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही लढाई नंतर एकतर्फी झाली. योगेश सागर यांनी जवळपास नव्वद हजारापेक्षा जास्त मतांच्या फरकाने काँग्रेसच्या यशवंत जयप्रकाश सिंह यांना पराभूत केलं. योगेश सागर यांना 127355 मते मिळाली आहेत तर यशवंत जयप्रकाश सिंह यांना 36201 मते पडली आहेत.