
महाराष्ट्रात नवीन महायुती सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका भव्य समारंभात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर युतीचे भागीदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतरचे चित्रही समोर आले आहे. तर यानंतर आता पहिली मंत्रिमंडळाची बैठकही घेतली आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारताच पहिली स्वाक्षरीची चर्चा होत आहे.