
आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून कुलाबा विधानसभा महत्त्वाची मानली जाते आणि इथलं राजकारणही खूप रंजक झालं आहे. आगामी निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघातील लढत अधिक रंजक ठरू शकते. भाजपने या भागात मजबूत पकड कायम ठेवली असली तरी काँग्रेसचे अशोक जगताप हेही येथे प्रमुख चेहरा आहेत. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने हिरा देवासी यांना तिकीट देऊन भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्यासमोर मैदानात उतरवले आहे.