
महाराष्ट्राचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्र्यांबाबत जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे. अशा स्थितीत शिवसेनेचे आमदारा दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले आहे.