
विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. त्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत पेच निर्माण झाला होता. यानंतर आठवड्याभरानंतर हा पेच सुटला. अखेर ५ डिसेंबरला महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्रीपदी शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर महायुतीसमोर खातेवाटपाचं आव्हान उभं राहिलं. यातूनही चर्चा आणि बैठका करून त्यांनी मार्ग काढला. आता महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला होणार आहे. मात्र यातच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शासकीय बंगला वर्षावरून वास्तव्य हलवलं नाही आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागरवर राहत आहेत. आता प्रश्न आहे की एकनाथ शिंदे वर्षा कधी सोडणार? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.