
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत.