
नागपूर : राज्याचे लक्ष असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग सहाव्यांदा ४० हजारांपेक्षा अधिक मतांनी एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळविला आहे. मतदानाची आठवी आणि चौदावी फेरी वगळता सर्वच फेऱ्यांत आघाडी घेत फडणवीस यांनी विजयी घोडदौड अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली.