

Maharashtra Assembly Election Result: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक काळ झाला तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापन झालं नाही. ना राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी अधिकृत दावा करण्यात आला, ना कोणत्याही पक्षाच्या हालचाली स्पष्ट झाल्या. ५ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेत वाद वाढत असून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. आधी मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला, तर आता गृहमंत्री पदावरून संघर्ष उभा राहिला आहे.