Suvidha 2.0 App UpdateSakal
Maharashtra Election 2024 Result
Suvidha 2.0 App : भारत निवडणूक आयोगाकडून ‘सुविधा 2.0’ अॅप अपडेट; अॅपद्वारे मिळणार निवडणूक परवानग्या
Dharashiv Suvidha 2.0 App : भारत निवडणूक आयोगाने ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे. या अॅपद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाइन सुविधेद्वारे मिळणार आहेत.
धाराशिव : भारत निवडणूक आयोगाने ‘सुविधा २.०’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे. या अॅपद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाइन सुविधेद्वारे मिळणार आहेत. पूर्वी फक्त ऑनलाइन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता या अॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.