Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Vidhan Sabha election 2024: २०१९ मध्ये राज्यामध्ये नेमकी कुणाची सत्ता येईल, हे सांगणं अवघड झालं होतं. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तीन आमदार होते. भाजपची सत्ता येतेय, अशी परिस्थिती होताच हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने सत्तेचा दावा केला. तेव्हा त्यांनी मविआला पाठिंबा दिला.
Published on

Maharashtra Assembly Election 2024: भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करुन हितेंद्र ठाकूर यांनी विरारच्या हॉटेलमध्ये खळबळ उडवून दिली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर ठाकूर चर्चेत होते. हे तेच ठाकूर आहेत ज्यांनी २००१ मध्ये स्व. विलासराव देशमुख यांचं सरकार तारलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com