
Igatpuri Assembly Election 2024 result Marathi News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची राळ एकीकडे, तर दुसरीकडे वर्षातील मुख्य पिकाची कापणी सुरू असल्याने उमेदवारांना मतदारांना भेटण्यासाठी थेट बांधावर जावे लागत आहे. कारण शक्यतो गावात वृद्धत्वाकडे झुकलेले, लहान बालके सोडून कोणीही नसल्याने गावांत सन्नाटा पाहायला मिळत आहे. इगतपुरी मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे हिरामण खोसकर, मनसेतर्फे काशीनाथ मेंगाळ, काँग्रेसतर्फे लकी जाधव, अपक्ष निर्मला गावित यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण केली आहे.
उदारसंघात केलेली विकास कामे, आरोग्यसेवा, दोन्ही तालुक्यांतील मास्क लिडर यांचे वैयक्तिक हितसंबंध सर्व समाजात असल्याचे दिसते. मनसेचे काशिनाथ मेंगाळ जिल्हा परिषद, तरुण वयापासून सामाजिक कामात असल्याने हक्काचे मतदान व पक्षाचे मतदान यावर भिस्त त्यांची भिस्त आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या माध्यमातून ते मते मिळवू शकतात.