Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Islampur Assembly Election 2024 Results : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेत.
Islampur Assembly Election 2024 Results
Islampur Assembly Election 2024 Resultsesakal
Updated on

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील 13 हजार 500 मतांनी विजयी झाले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. इस्लामपूर मतदारसंघावर सलग 35 वर्षे जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा डाव टाकण्यात आला होता. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू अशी ओळख असलेल्या निशिकांत यांच्यासमोर जयंतरावांच्या विजयाचा वारू रोखण्याचं आव्हान होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com