
जोगेश्वरी पूर्व ही जागा महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी एक आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचा एक भाग, हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते रवींद्र वायकर सध्या येथून आमदार आहेत. येथील जनतेने रवींद्र यांना सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. यावर्षी इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा वायकर तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनंत नर यांना मैदानात उतरवले आहे. यांच्यात कडवी टक्कर होणार आहे.