Kagal Vidhansabha Election Rohit Pawar vs Hasan Mushrifesakal
Maharashtra Election 2025 Result
Kagal Election : 'मुश्रीफांनी बुद्ध विहारांमध्ये 50 टक्के मार्जिन घेतले'; रोहित पवारांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप
Kagal Vidhansabha Election : शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भातील पालकमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश म्हणजे त्यांचा बालिशपणा आहे.
Summary
''हसन मुश्रीफ येथील जनतेला सांगतात की, मी विकासकामांसाठी गेलो. तुमचा विकास म्हणजे कामे पंधराशे कोटींची आणि मलिदा सातशे कोटींचा. तुम्ही रस्त्यांच्या कामात ढपला पाडला.''
मुरगुड : `पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) पळून गेले. मात्र, इथल्या मातीने आपल्याला लढायला शिकवले आहे, पळून जायला नाही. पालकमंत्री पदासाठी तुम्ही शरद पवारांच्या विचारांना तिलांजली दिली. बुद्ध विहारांमध्ये (Buddha Vihara) पन्नास टक्के मार्जिन घेतल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. मुरगूड येथे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते.
