
Kalyan West Assembly Election 2024 result : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची दुहेरी झाली. यावेळी ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना संधी देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना उमेदवार देण्यात आली होती. तर मनसेकडून उल्हास भोईर मैदानात उतरले होते. पण विश्वनाथ भोईर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आणि ४२४५४ मताधिक्याने विजय मिळवला. सचिन बासरे यांनी लढत देत ८३५६६ मते मिळवली. विश्वनाथ भोईर यांनी एकूण १२६०२० मते घेत बाजी मारली. तर, मनसेच्या उल्हास भोईर यांना २२११४ मतांवर समाधान मानावे लागले.