Kamthi Vidhan Sabha
Maharashtra Election 2025 Result
Kamthi Vidhan Sabha: कामठीत भाजपची सत्ता मोडीत काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न! कसं आहे मतांचं गणित?
गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेला कामठी विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेण्याची तयारी यावेळी काँग्रेसनं केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेला कामठी विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेण्याची तयारी यावेळी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे नेते यासाठी जोरदार कामाला लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणुकी लढली जात आहे, तर दुसरीकडं काँग्रेसचे सुनील केदारही अधिक सक्रिय झाले आहेत. सामाजिकदृष्ट्या चार समाजाची मतं इथं मोठी असून त्यांचा इथं प्रभाव आहे. यातून भाजप कशी तरेल, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
