यापूर्वीच्या पाटील व महाडिक गटाच्या टोकाच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव करण्याची ईर्ष्या दिसून आली. त्याचाच संदर्भ देत ‘नादान है वो लोग, जो समंदर को सुखाना चाहते है,’ असा सूचक टोमणाही एका फलकातून मारला आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर आमदार सतेज पाटील (Satej Patil) गटाच्या समर्थकांनी कसबा बावडा परिसरात लावलेल्या फलकांमधून ‘निष्ठेत तडजोड नाही’, ‘एक कुस्ती हरली म्हणून खचणार नाही’, ‘राजा हा राजा असतो’, ‘देव बदलायची सवय आम्हाला नाही’, असे सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.