Koregaon Assembly Election
Shashikant Shinde vs Mahesh Shindeesakal

Koregaon Vidhansabha: कोरेगावात कोण ठरणार 'जॉइंट किलर'? पुन्हा शिंदे विरुद्ध शिंदेच सामना, 'त्या' पराभवाचा काढणार वचपा!

Koregaon Assembly Election Shashikant Shinde Mahesh Shinde : निसटता पराभव झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांना लगेचच विधान परिषद देण्यात आली.
Published on
Summary

‘काँटे की टक्कर’ झालेल्या या निवडणुकीत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव करत जिल्ह्यात ‘जॉइंट किलर’ म्हणून बिरुदावली प्राप्त केली.

कोरेगाव : विधानसभा मतदारसंघात (Koregaon Assembly Constituency) मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात झालेली तुल्यबळ लढत या वेळी पुन्हा पाहायला मिळणार आहे; परंतु मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महेश शिंदे यांची शिवसेना व शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची राष्ट्रवादी राज्यस्तरावर उभी दुभंगली आहे. गत विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेले शशिकांत शिंदे पुन्हा एकदा कोरेगावात जनमत अजमावणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com