विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिली सभा पदाधिकाऱ्यांची होती. यावेळी भाषणाच्या शेवटी माजी आमदार नाईक हे खूप भावूक झाले.
कुडाळ : माझा पराभव हा लढाई करून झाला आहे. पराभव स्वीकारला असून कोणतीही कारणे द्यायची नाहीत. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे, असे प्रतिपादन कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केले. कुडाळ तालुका शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आज माजी आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.