
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हफ्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार?