.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लातूरः विधानसभेच्या लातूर जिल्ह्यातील सहापैकी काही मतदारसंघांत काही उमेदवारांनी बंडाचे निशाण फडवकले होते. पण, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, आज बंडाचे निशाण थोपवण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. याकरिता कोणाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर आदेश दिले, तर कोणाला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फोन केला. केवळ अहमदपूर मतदारसंघात मात्र भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी उमेदवारी कायम ठेवत बंड केले आहे.