

Election Result 2024 : मागाठाणे मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्देश पाटेकर पराभूत झाले आहेत. प्रकाश सुर्वे यांनी 105527 मते मिळाली आहे. उद्देश पाटेकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक होते. पहिल्यांदाच त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं. 105527 मते प्रकाश सुर्वे यांना मिळाली आहेत तर उद्देश पाटेकर यांना 47363 मते पडली आहेत.