
Maharashtra Assembly election 2024 Voting and Exit Poll updates: महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते.
तरी हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अंदाजे ६६ टक्के मतदान झाले आहे. तरी रात्री ९ वाजून गेल्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीचा अधिकृत आकडा समोर आलेला नव्हता. मतदानाची अधिकृत टक्केवारी उद्या स्पष्ट होईल.
याशिवाय राज्यात कोणाचं सरकार येणार? याचा अंदाज विविध एक्झिट पोलद्वारे आज समोर आले आहेत. काही पोलनुसार महाविकास आघाडी, तर काही पोलनुसार महायुतीला अधिक जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
त्यामुळे एक्झिट पोलमध्येही मविआ आणि महायुती यांच्यात चुरस असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार, हे २३ नोव्हेंबर रोजी समजणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.