Congress General Secretary Priyanka Gandhiesakal
Maharashtra Election 2025 Result
'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला
Maharashtra Assembly Elections Congress General Secretary Priyanka Gandhi : महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे एकहाती सत्ता द्या, म्हणजे कुणाला सरकार चोरता येणार नाही.
Summary
पंतप्रधान नरेंद्र मोदी उठता-बसता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि कै. ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याच पाठीत खंजीर खुपसतात. ते असे कसे काय करू शकतात, असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेने निवडून दिलेले सरकार खरेदी करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. मोदी भ्रष्टाचारावर बोलतात आणि संविधानावर भाषणे देतात आणि दुसरीकडे आमदार विकत घेऊन जनतेला दिलेला सरकार निवडण्याचा अधिकार हिरावून घेतात. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे एकहाती सत्ता द्या, म्हणजे कुणाला सरकार चोरता येणार नाही, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी येथे केली.
