Maharashtra assemblyesakal
Maharashtra Election 2025 Result
Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा? व्हायरल पत्राने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं! नेमकं काय घडलं?
Sandip Deshpande vs Milind Deora: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे.
Maharashtra Election Assembly 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याच्या निवडणुकीत १२८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मुंबईच्या माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि ही जागा मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यात वरळी मतदार संघातून त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकर गट) उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी या मतदार संघातून शिवसेनेकडून मिलींद देवरा हेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे वरळीचे सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नक्कीच नसेल. अशात बुधवारी मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापल्याचे दिसले. हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत गेले आहे.

