
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. २८८ पैकी १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. ते ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक किस्से समोर येत आहेत. असाच एक त्यांच्या मॉडलिंगचा किस्सा समोर आला आहे. यामुळे त्यांचं अटलबिहारी वाजपेयींनी कौतुक केलं होतं.