गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. तर काही ठिकाणी नद्या पात्राबाहेर पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. पण आजपासून पुढील दोन दिवसात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासात पावसाचा जोर कमी होईल. पाऊस विश्रांती घेणार असून तीन दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.