गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडेच, अजितदादांकडे अर्थ खातं राहणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांकडचे महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं असणार आहे..कल्याणमध्ये मारहाण झालेल्या मराठी कुटुंबातील जखमी तरुणाची खासदार सुरेश म्हात्रे यांनी भेट घेतली. अभिजीत देशमुख हा तरुण अखिलेश शुक्ला यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाला होता. अखिलेश शुक्लासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय..कल्याणमधील अजमेरा हाईट्स सोसायटीमध्ये झालेल्या वादातून मराठी कुटुंबावर शुक्ला कुटुंब व इतर तरुणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. .मुंबईच्या बोरिवली परिसरातील रस्त्यांवर सर्वाधिक अतिक्रमणे असल्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे मात्र आता पालिका प्रशासन आणि बोरिवली पोलिसांनी रस्त्यावरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला आहे. .अवघ्या काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला म्हाळुंगे इंगळे ते बिरदवडी ( ता.खेड ) हा डांबरी रस्ता जलवाहिनीच्या कामासाठी खोदला जात आहे.आधीच वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या चाकण एमआयडीसीतील नागरिकांची या खोदाईमुळे अजून डोकेदुखी वाढली आहे.काही ठिकाणी जवळपास निम्मा डांबरी रस्ता या कामात खोदला जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना धुळीचा आणि वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. हे काम झाल्यानंतर हा रस्ता दुरुस्त केला जाईल की नाही ? याबाबत स्थानिक नागरिक साशंक आहेत..-जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. -या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते.-असा विश्वास उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी कामती (ता. मोहोळ) येथील सीनाई कृषी पर्यटन केंद्रात झालेल्या पर्यटन चर्चासत्रात ते बोलत होते. .- शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा निषेध - वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन.नागपूर : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळावा, संत्र्याची परदेशात निर्यात करता यावी यासाठी सर्व विमानतळांवर संत्रा विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या समस्यांवर आ. चरणसिंग ठाकूर यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. .पुण्यातील बालगंधर्व चौकात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असून बालगंधर्व चौकात जोरदार आंदोलन सुरू आहे. .शहरातील विविध व्यायामशाळांमध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी या उद्देशाने स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे चंद्रशेखर सावंत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर ( वय ३२, रा.खडकी) आणि साजन अण्णा जाधव (वय २५, रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे..पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी गौतमी पाटील दाखल. गौतमी पाटीलची पुस्तक महोत्सवाला भेट. .केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे NH-44 वर भारतातील पहिल्या बायो-बिटुमेन-आधारित NH स्ट्रेचचे अनावरण केले..हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. यावेळी ते म्हणाले की आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू..राहुल गांधी उद्या परभणीला जाणार असून ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांच्या सोबत विजय वडेट्टीवार देखील भेटीला जाणार आहेत.."राममंदिर आंदोलनात शिवसेना, काँग्रेसचेही योगदान होते" असे खासदार संजय राऊत म्हणाले..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे मध्यवर्ती स्मारकात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले..संसद परिसरातल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि केंद्रीय उद्योग मंत्री कुमारस्वामी यांनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात श्री काळारामाचे दर्शन घेतले. दोघांनीही मंदिरात पूजाविधी करून भक्तीभावाने दर्शन केले. यावर्षी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये येऊन श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनेक नेत्यांनी या मंदिराला भेट देण्यास सुरुवात केली आहे..शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांच्या बंगल्याजवळ काल जे दोघे संशयित दिसले होते, त्यांना लेकराने मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यासाठी आले होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे. सकाळी ९.१५ वाजता दोन संशयित इसम मोटारसायकलवर राऊत यांच्या घराजवळ आले होते. या तक्रारीवर पोलिसांनी चौकशी केली, आणि हे दोघे संबंधित मोबाईल नेटवर्कचे टेस्टिंग करणारे कर्मचारी असल्याचे समोर आले. तपासानंतर, या इसमांचा संबंध 'सेलप्लॅन' आणि 'इन्स्टा आयसीटी सोल्युशन्स' कंपन्यांशी आहे, तसेच ते जीओ मोबाईल नेटवर्कसाठी टेस्टिंग करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कपूरबावडी परिसरातून ताब्यात घेतले आणि संबंधित कंपनीकडून सत्यता पडताळून ही माहिती दिली..नवी मुंबईच्या समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवासी बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेत ही बोट बुडली होती. दुर्घटनेपासून बेपत्ता असलेल्या जोहान निस्सार अहमद यांची बॉडी अखेर सापडली आहे. त्यांची ओळख पटली असून, मृतांची संख्या वाढल्याने या दुर्घटनेत मोठा त्रास झाला आहे. बचाव कार्य सुरु असून, शिकार तसेच शोध घेणाऱ्या दलांनी आणखी शोध मोहीम राबवली आहे..महाराष्ट्राचे राजकीय दिग्गज शरद पवार बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात दाखल झाले. येथे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्याच्या प्रकरणात पवार यांनी स्थानिकांसोबत बैठक घेतली..चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या शिपाई पदासाठी आयोजित ऑनलाइन परीक्षा पुण्यातील नोवा कन्सल्टन्सी परीक्षा केंद्रावर गोंधळाचा सामना करत होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना अचानक सांगण्यात आले की, सर्व्हर डाउन आहे, ज्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पुण्याबाहेरून परीक्षा देण्यासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना यामुळे मोठा गोंधळ आणि अडचणींना सामोरे जावे लागले..पुणे सातारा रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांब रांगासलग सुट्टी आल्याने खेड शिवापुर टोल नाक्यावर वाहनांच्या लागल्या रांगा पुणे सातारा रोड वरती ही रस्ता खराब असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर.मागील १० दिवसात क्विंटल मागे जवळपास २ हजार रुपयांनी घसरले भाव कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला क्विंटल मागे सरासरी १८०० ते २००० हजार रुपयांचा भाव बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण कांद्याचे भाव गडगडल्याने, आहे त्या भावात उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल - .खातेवाटपावरून महायुतीत खलबते सुरूच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये खात्यांच्या संदर्भात चर्चारामगिरी बंगल्यावर दोघांमध्ये अर्धा तासापासून चर्चा.नागपुरात आज भाजपची संघटनात्मक बैठकभाजपातील अंतर्गत निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत बैठकीचे आयोजनभाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसह आमदार आणि जिल्हाध्यक्ष राहणार उपस्थित\.शरद पवार आज बीड येथील मस्साजोग दौऱ्यावर जाणार....मस्साजोग खुन प्रकरणी पिडित सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार.... .बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता येथे "पुना ऑटोमोबाइल" या दुकानात आज पहाटे साडेपाच वाजता आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली.या घटनेत सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली व अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली..धनंजय मुंडे हे विजयगड बंगल्यावर अजित पवार यांना भेटण्यासाठी आले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 8.00 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी चहापानासाठी जाणार आहेत.त्यानंतर 10.00 वाजता ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.