
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. मात्र निवडणुकीत विजयी झालेल्या महायुती आघाडीत अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी विचार सुरू आहे. तर पराभवाचा सामना करणाऱ्या महाविकास आघाडीला मात्र पराभवातून सावरता आलेले नाही. आता आघाडीतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राज्यातील पराभवाला काँग्रेसचा अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याचा मोठा दावा महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अशातच आता राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.