
Jogeshwari Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच लागला असून यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात देखील फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवार मनीष वायकर यांनी ही मागणी केली आहे. यासाठी वायकर कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. लोकसभेतही अशीच फेरमतमोजणी झाली होती. यात शिंदे गटाचे रविंद्र वायकर निवडून आले होते.