Markadwadi Voting: गावकऱ्यांचं मतदान जानकरांना... सातपुतेंना 1003 मते कशी मिळाली; बटण दाबलं की कुणीकडं मत जात... गावकरी काय म्हणाले?

Markadwadi Voting: Solapur Village Challenges Election Results : मारकवाडी गावातील पुन्हा मतदानाचा निर्णय प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. ईव्हीएमबद्दलचा अविश्वास आणि बॅलेट पेपरचा आग्रह ही प्रक्रिया पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण करीत आहे.
Markadwadi villagers
Markadwadi villagers preparing for a re-vote using ballot papers due to EVM concernsesakal
Updated on

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएमवर अनेक आरोप झाले आहेत. विरोधी नेत्यांनी याआधी अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेत गडबडीचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावाने स्वतःच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी स्वतःची निवडणूक प्रक्रिया राबवण्याची तयारी केली असून, त्यासाठी चक्क बॅलेट पेपर वापरण्यात येणार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडी गावात भाजपच्या उमेदवाराला अनपेक्षित मताधिक्य मिळाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com