
Maval Assembly Election 2024 final result live : विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मावळ मतदार संघाच्या निकालाकडेही यंदा अनेकांचे लक्ष होते.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात थेट लढत यंदा पाहायला मिळाली. मावळमधील ही दोन्ही मोठी नावं असल्याने त्यांच्यातील कोण बाजी मारणार याकडे लक्ष होते. अखेर ही बाजी सुनील शेळके यांनी जिंकली.