मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचे सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुखकर झाला आहे, असे क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूर : महाराष्ट्राने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. विधानसभा निवडणुकीत कॉमन मॅन म्हणून त्यांचा चेहरा चालला. त्यांच्यामुळेच महायुतीचा विजय झाल्याचे मत आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केले. ज्याचे जास्त आमदार त्यांना पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला असल्याने पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचेही सांगितले.