
मुंबई, ता. ५ : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर विरोधी पक्ष महायुती आणि विशेषत: भाजपवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे.