Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: भाजप नेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तिस-यांदा शपथ घेतली. मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडलेल्याशपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. तर राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त चित्रपट, उद्योग आणि क्रीडा विश्वातील अनेक मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहिले.