
Nashik Central Assembly Election 2024 result Marathi News: सुरुवातीच्या पाच-सहा फेऱ्यांमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मतांची आघाडी घेतली होती. साधारणतः सहाव्या फेरीनंतर जुने नाशिक गावठाण परिसरातील मतपेटींची मोजणी सुरू झाली. व वसंत गीते यांनी मतांमधील तफावत भरून काढली. एका टप्प्यावर मतांमधील फरक अवघ्या सहा हजारांवर आलेला होता. मात्र 18 व्या फेरी अखेर फरांदे यांना 86237 हून अधिक मतांची आघाडी मिळालेली आहे.
नाशिक मध्य मतदारसंघ वैविध्यपूर्ण असल्याने टोकाच्या दुर्बल घटकांपासून तर उच्चभ्रू श्रीमंत मतदार या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे परिसर तसा प्रचाराचा फंडा उमेदवारांकडून अवलंबला जातो आहे. उच्चभ्रू वसाहतीमध्ये मोठ्या सोसायट्यांना उमेदवार भेटी देताना मतदानासाठी गळ घालत आहेत. याशिवाय मोटारसायकल रॅली, चौकसभा व इतर उपक्रमांचे आयोजन केले जाते आहे.
महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे व महाविकासा आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार वसंत गिते यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. यापूर्वी याच दोन्ही उमेवारांमध्ये २०१४ मध्ये लढत झाली आहे. मुशीर सैय्यद यांच्या उमेदवारीमुळं काही प्रमाणात मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय दलित, ओबीसी मतदारांचे मतदान देखील विजयाचा मार्ग सुकर करतील.