
Nashik West Assembly Election 2024 result Marathi News: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी विजयी लीड घेतला आहे. त्यामुळं त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळं महिलांनी ठेका धरत जल्लोष सुरु केला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि खानदेशी मतदारांचे प्राबल्य असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची 'सातपूर विरुद्ध सिडको' अशी थेट विभागणी झाली आहे. सिडकोतून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आव्हान उभं केलं आहे, तर सातपूरमध्ये 'मनसे चे उमेदवार दिनकर पाटील व त्यांचे बंधू माजी महापौर दशरथ पाटील यांनी 'स्वराज्य' पक्षाच्या माध्यमातून मतदारांना साथ घातली आहे.