
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट ) आमदार नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये असा दबाव महायुतीमधील मित्र पक्षाचा असतानाही हा दबाव झुगारून नवाब मलिक यांनी मानखुर्द - शिवाजीनगर मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर न करता त्यांना ‘एबी’ अर्जही दिला आहे. त्यामुळे पक्षाचे ‘घड्याळ’ हे चिन्ह त्यांना अधिकृतपणे मिळणार आहे.