राज्याच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. नागपूरच्या राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या (शिंदे गट)11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणें यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे बंधू आमदार निलेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.