Pandharpur Assembly Elections 2024sakal
Maharashtra Election 2024 Result
Pandharpur Assembly Elections 2024: आघाडीत बिघाडी चव्हाटय़ावर,अनिल सावंताचा राष्ट्रवादीकडून अर्ज
Pandharpur Assembly Elections 2024: पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत उमेदवारी अर्ज दाखल करून महाविकास आघाडीला पुन्हा चर्चेत आणले आहेत.
मंगळवेढा: पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे राज्यातील महाविकासाकडे सरकारचा करेक्ट कार्यक्रम झाला असला तरी आता पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून 12 तास उलटण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भैरवनाथ कारखान्याच्या उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीतील पुन्हा चव्हाट्यावर आली.

